Kamathi Assembly Constituency । आज राज्यात विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्राच्या 48 व्या विधानसभा क्षेत्र कामठी मतदारसंघावर सर्वांचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून सुरेश भोयर तर भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. त्यातही याठिकाणचा इतिहास देखील तेवढाच रंजक आहे. अखेर या ठिकाणी विजयाचा गुलाल कोण उधळणार हे पाहणे गरजेचे आहे .
विधानसभेचा इतिहास
नागपुरमधील कामठी हे एक महत्वाची विधानसभा आहे. या विधानसभेवर बरेच वर्ष काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यानंतर 2004 मध्ये भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय मिळवला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकामागोमाग तीन विधानसभा निवडणूका जिंकल्या. त्यानंतर भाजपने दुसऱ्या चेहऱ्याला संधी दिली आणि टेकचंद सावरकर यांना उमेदवारी मिळाली. टेकचंद यांनीही 2019 च्या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळला.कामठी मतदारसंघ
मतदारांची संख्या
पुरुष मतदार…..2,51 ,369
महिला मतदार—2,50,383
इतर मतदार——-18
एकूण मतदार…… 5 लाख 1 हजार 770
2019 मधील निवडणूक
कामठी विधानसभेवर 2019 च्या निवडणुकीत भाजपाचा प्रभाव जास्त होता. भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे तीन वेळा विजयी ठरले होते, त्यानंतर टेकचंद सावरकर यांना उमेदवारी दिली. त्यांच्यासमोर काँग्रेसचे सुरेश भोयार होते.
याव्यतिरिक्त, वीबीए, बीएसपी आणि एआयएमआयएम या पक्षांनीही आपले उमेदवार उभे केले होते. जनतेने पुन्हा एकदा भाजपाच्या उमेदवाराला पसंती दिली. टेकचंद सावरकर यांना एकूण 118,182 मते मिळाली, तर काँग्रेसचे सुरेश भोयार यांना 1,07,066 मते मिळाली.
कामठी विधानसभा मतदारसंघातील जातीय समीकरणांचा विचार केला तर येथे सुमारे 18 टक्के दलित, 6 टक्के आदिवासी, आणि 10 टक्के मुस्लिम मतदार आहेत. शहरी आणि ग्रामीण मतदारांमध्येही चांगला समतोल आहे. जिथे सुमारे 45 टक्के शहरी आणि 55 टक्के ग्रामीण मतदार आहेत.