कांबळेंना श्रीरामपूरमधूनही मताधिक्‍य नाही

नगर  –शिर्डी लोकसभा मतदारसंघात सदाशिव लोखंडे यांना सुरुवातीपासून आघाडी मिळाली. ती शेवटपर्यंत कायम राहिली. आमदार भाऊसाहेब कांबळे यांना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून देखील मताधिक्‍य मिळविता आले नाही. त्यांना फेरीनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे…

शिर्डी लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासून शिवसेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी आघाडी घेतली. पहिल्या फेरीत कॉंग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांना 17 हजार 104 मते मिळाली तर खा. लोखंडे यांना 24 हजार 842 मते मिळाली. या फेरीत 7 हजार 648 मतांची आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत कांबळे पिछाडीवर राहिले. या फेरीत 7 हजार 688 मतांची आघाडी घेवून दुसऱ्या फेरीअखेर 15 हजार 336 मतांची आघाडी खा. लोखंडे यांनी घेतली होती. या फेरीत कांबळे यांना 16 हजार 472 तर लोखंडे यांना 24 हजार 160 मते मिळाली होती. तिसऱ्या फेरी लोखंडेची आघाडी साडेतीन हजारांनी कमी झाली.

या फेरीत कांबळे यांना 16 हजार 495 मते मिळाली तर लोखंडे यांना 20 हजार 611 मते मिळाली. या फेरीत 4 हजार 116 मतांची आघाडी घेवून तिसऱ्या फेरीअखेर 19 हजार 452 मतांची आघाडी घेतली. या फेरीपर्यंत कांबळे यांना 33 हजार 666 मते मिळाले तर लोखंडे यांना 49 हजार 2 मते मिळाली. या निवडणुकीत वंचित आघाडीचा प्रभाव दिसून आला असून संजय सुखदान यांना 7 हजार 4 मते मिळाली आहे. चौथ्या फेरीपर्यंत कांबळे यांना 50 हजार 161 मते होती. तर लोखंडे यांना 69 हजार 613 मते मिळाली. अशी लोखंडे यांनी 26 हजार 303 मतांची आघाडी घेतली.

पाचव्या फेरीपर्यंत कांबळे यांना 67 हजार 657 तर लोखंडे यांना 93 हजार 960 मते मिळाली. पाचव्या फेरीपर्यंत विधानसभा मतदारसंघनिहाय पाहिले असता अकोले व संगमनेरमधून कांबळे यांना आघाडी मिळाली असून लोखंडे यांना शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा या चार तालुक्‍यातून आघाडी मिळाली. या फेरीत 3 हजार 253 मतांची आघाडी घेवून लोखंडे यांनी 29 हजार 556 मतांची आघाडी मिळविली. सहाव्या फेरीत लोखंडे यांना 1 लाख 38 हजार 430 तर कांबळे यांना 1 लाख 2 हजार 228 मते मिळाली. वंचितचे संजय सुखदान 23 हजार 834 मते मिळाली. या फेरीनंतर लोखंडे यांनी 36 हजार 142 मतांची आघाडी घेतली.

सातव्या फेरीत लोखंडे यांना 1 लाख 62 हजार 163 तर कांबळे यांना 1 लाख 21 हजार 558 मते मिळाली. या फेरीअखेरीस लोखंडेंनी 40 हजार 605 मतांची आघाडी घेतली. आठव्या फेरीत लोखंडेंनी 1 लाख 88 हजार 566 पर्यंत मजल मारली. कांबळे यांना मात्र 1 लाख 39 हजार 599 मते मिळाली. लोखंडे यांनी 48 हजार 967 मतांची आघाडी घेतली. नवव्या फेरीत लोखंडे यांना 2 लाख 15 हजार 872 तर कांबळे यांना 1 लाख 55 हजार 151 मते मिळाली. या फेरीपर्यंतचा निकाल पाहिला तर वंचित आघाडीचे सुखदान व अपक्ष माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी कांबळे यांचे वादे केल्याचे दिसून येत आहे. सुखदान यांनी 32 हजार 701 तर वाकचौरे यांना 16 हजार 406 मते मिळाली.

दहाव्या फेरीपर्यंत लोखंडे यांना 2 लाख 40 हजार 968 तर कांबळेंना 1 लाख 74 हजार 791 मते मिळाली आहे. या फेरीअखेर 66 हजार 177 मतांनी लोखंडे यांनी आघाडी घेतली. अकराव्या फेरीत ही आघाडी वाढ गेली. 69 हजार 702 मतांची आघाडी लोखंडेंनी घेतली. त्यांना 2 लाख 63 हजार 649 मते मिळाली. कांबळेंना 1 लाख 93 हजार 941 मते मिळाली. बाराव्या फेरीत लोखंडेंनी 72 हजार 917 मतांची आघाडी घेतली. त्यानंतर तेराव्या फेरीमध्ये देखील ती कायम ठेवून लोखंडेंनी 81 हजार 70 मतांची आघाडी घेतली. चौदाव्या फेरीत लोखंडेंना 3 लाख 36 हजार 117 तर कांबळेंना 2 लाख 14 हजार 192 मते मिळाली. या फेरीनंतर लोखंडे यांनी तब्बल 87 हजार 315 मतांची आघाडी घेतली. पहिल्या फेरीपासून मिळालेली आघाडी लोखंडे यांना चौदाव्या फेरीपर्यंत कायम ठेवली होती. 15 व्या फेरीत लोखंडे यांनी 91 हजार 695 मतांची आघाडी घेतली. लोखंडे यांना 3 लाख 60 हजार 47 तर कांबळे यांना 2 लाख 68 हजार 342 मते मिळाली. 16 व्या फेरीत लोखंडे यांना 3 लाख 82 हजार 511 तर कांबळे यांना 2 लाख 85 हजार 901 मते मिळाली.

या फेरीमध्ये लोखंडेंना केवळ 4 हजार मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे 96 हजार 610 मतांची आघाडी लोखंडे यांना मिळाली. 17 व्या फेरीत लोखंडे यांना 4 लाख 6 हजार 475 तर कांबळे यांना 3 लाख 4 हजार 281 मते मिळाली. या फेरीत लोखंडे यांनी 1 लाख 2 हजार 194 मतांची आघाडी घेतली. 18 व्या फेरीत लोखंडे यांना 4 लाख 30 हजार 862 तर कांबळे यांना 3 लाख 21 हजार 870 मते मिळाली. यातून लोखंडे यांनी 1 लाख 8 हजार 992 मतांची आघाडी घेतली. 19 व्या फेरीत लोखंडे यांना 1 लाख 14 हजार 784 मतांची आघाडी मिळाली. त्यात लोखंडे यांना फेरीनंतर 4 लाख 53 हजार 577 तर कांबळे यांना 3 लाख 38 हजार 793 मते मिळाली. 20 व्या फेरीमध्ये लोखंडे यांना 4 लाख 67 हजार 322 तर कांबळे यांना 3 लाख 51 हजार 803 मते मिळाली. या फेरीत लोखंडे यांनी 1 लाख 15 हजार 519 मतांची आघाडी घेतल्यानंतर त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.