Kamala Harris | अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. येत्या पाच नोव्हेंबर रोजी अमेरिकेत मतदान होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस हे दोघेही विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना त्यांच्या भारतातील बालपणीच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत बालपणीच्या कमला हॅरिस आणि त्यांची आई डॉ. श्यामला गोपालन हॅरिस दिसत आहे. कमला हॅरिस यांनी फोटो शेअर करत कॅप्शन लिहिले की, ‘माझी आई वयाच्या 19 व्या वर्षी भारतातून अमेरिकेत आली. त्यांचे धाडस आणि दृढ संकल्पामुळे मी काही बनू शकले.’ तसेच कमला हॅरिस एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखातही भारतातील प्रवास आणि आईच्या आठवणी यासंदर्भात उल्लेख केला आहे.
My mother, Dr. Shyamala Gopalan Harris, came to the United States from India alone at the age of 19. Her courage and determination made me who I am today. pic.twitter.com/nGZtvz2Php
— Vice President Kamala Harris (@VP) November 2, 2024
ऑनलाइन दक्षिण अशियाई प्रकाशन ‘द जैगरनॉट’मध्ये त्यांनी हा लेख लिहिला आहे. त्यात त्या म्हणतात, दरवर्षी दिवाळी साजरी करण्यासाठी आम्ही भारतात जात होतो. त्या ठिकाणी आजी-आजोबा, काका-काकू, भाऊ-बहिणीसोबत दिवाळी साजरी करत होतो. माझी आईचे दोनच लक्ष्य होते. एक म्हणचे स्तनाचा कर्करुग्णांना वाचवणे आणि मुलींचे पालन पोषण करणे हे होय
कलमा हॅरिस यांनी पुढे सांगितले की, माझे आजोबा त्यांच्या सकाळच्या नित्यक्रमाचा भाग म्हणून त्यांच्या निवृत्त मित्रांसह समुद्रकिनाऱ्यावर लांब फिरायला जायचे. या काळात मी त्यांच्याकडून वाईटावर चांगल्याचा विजय आणि लोकशाहीशी संबंधित अनेक गोष्टी ऐकत होते.माझ्या आजोबांनी मला लोकशाहीचा अर्थच नाही तर लोकशाही टिकवण्याचा धडा शिकवला होता. त्यातून मला लोकांची सेवा करण्याची आवड निर्माण झाली आणि आजही ते मला मार्गदर्शन करत आहेत.