नवी दिल्ली – कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबणे म्हणजे बलात्काऱ्यांपासून सुटका, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले आहे. भाजप उमेदवार हरिनारायण राजभर यांच्या प्रराचार्थ मोदी उत्तरप्रदेश येथे बोलत होते.
अलवर येथे झालेल्या बलात्काराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी म्हणाले कि, कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबणे म्हणजे बलात्काऱ्यांपासून सुटका होय.आरोपीना कडक शिक्षा देण्यात येईल, असेही त्यांनी म्हंटले. ते पुढे म्हणाले, भाजप अध्यक्ष अमित शाह यांचं रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात टीएमसी कार्यकर्त्यांनी ईश्वरचंद विद्यासागर यांच्या मूर्तीची तोडफोड केली. आमचे सरकार आल्यास आम्ही त्याजागी ईश्वरचंद यांची पंचधातूची मूर्ती स्थापित करू आणि टीएमसी कार्यकर्त्यांना उत्तर देऊ, असे मोदी यांनी म्हंटले आहे.
PM Modi in Mau: We saw hooliganism by TMC workers again during Bhai Amit Shah's roadshow in Kolkata, they vandalized Ishwar Chandra Vidyasagar's statue. We are committed to Vidyasagar's vision and will install his grand statue at the same spot pic.twitter.com/avn1VN1QQ8
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 16, 2019