कमल नाथ आणि पत्नीच्या नावे 124 कोटींची संपत्ती

पुत्र नकुल 660 कोटींच्या मालमत्तेचे धनी
भोपाळ  – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते कमल नाथ तसेच त्यांच्या पत्नी अलका या दाम्पत्याच्या नावे 124 कोटी रूपयांची संपत्ती आहे. तर नाथ यांचे पुत्र नकुल तब्बल 660 कोटी रूपयांच्या मालमत्तेचे धनी आहेत.
कमल नाथ यांनी मंगळवारी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी छिंदवाडामधून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासमवेत जोडण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात नाथ दाम्पत्याच्या संपत्तीचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. छिंदवाडा जिल्ह्यात त्यांच्या मालकीची 67 एकर जमीन आहे. नाथ यांचे वार्षिक उत्पन्न 2017-18 मध्ये 1 कोटी 38 लाख रूपये तर त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न 96 लाख रूपये होते. दरम्यान, नाथ यांचे पुत्र नकुल छिंदवाडा मतदारसंघातूून लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. व्यावसायिक असणाऱ्या नकुल यांच्याकडे आई-वडिलांपेक्षा पाचपट अधिक संपत्ती आहे. नकुल यांचे वार्षिक उत्पन्न 2017-18 मध्ये 2 कोटी 76 लाख रूपये तर त्यांच्या पत्नी प्रिया यांचे वार्षिक उत्पन्न 4 कोटी 18 लाख रूपये इतके दाखवण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.