तमिळसह हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता कमल हसनच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. कमल हसनने आपल्या 232 व्या चित्रपटाची नुकतीच घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नसले तरी त्याला “कमल हसन 232′ असे संबोधले जात आहे.
प्रख्यात अभिनेता-निर्माता कमल हसन म्हणाला, आता आणखी एका नवीन प्रवासाची सुरुवात होत आहे. या चित्रपटात अनिरुद्ध रविचंदर हे कंपोझरची भूमिका साकारणार आहे.
यासोबत कमल हसने एक पोस्टरही सोशल मीडियावर शेअर केले आहे. यात लिहिले आहे की, “कधी काळी येथे भूत राहत होते.’ यात बंदुकीमधून एका माणसाचा फोटो दाखविण्यात आला आहे.
अनिरुद्धनेही सोशल मीडियावर आपल्या खास शैलीत लिहिले की, “लोकेश कनगराज यांच्या दिग्दर्शनात कमल हसन यांच्या चित्रपटाला संगीत देण्यासाठी मी खूपच उत्साहित आहे.
दरम्यान, कमल हसन यांच्या या पोस्टवर प्रशंसकांनी हजारोंच्या संख्येने प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट केली की, सर, खूप खूपच शुभेच्छा! आम्हाला या चित्रपटाची प्रतीक्षा आहे.
View this post on Instagram