Kamal Haasan | अभिनेता अलीकडेच ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटात दिसले होते. यातील त्यांची व्यक्तीरेखा आणि उत्साह पाहून सर्वच थक्क झाले होते. परंतु आता कमल हसन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर चाहत्यांना एक विनंती केली आहे. त्यांनी सोशल मीडियाद्वारे विनंती केली आहे की, त्यांच्या चाहत्यांनी त्यांना ‘उलगनायगन’ किंवा इतर कोणत्याही नावाने हाक मारू नये अशी माझी इच्छा आहे.
कमल हासनने त्याच्या X अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने सर्वप्रथम त्याच्या चाहत्यांचे आणि मीडियाचे आभार मानले. ते म्हणाले की, ‘त्यांना उलगनायगन म्हणजेच जगाचा नायक म्हणू नये. मला कमल नावानेच हाक मारावी. तुमचे माझ्यावर असलेल्या अपार प्रेमामुळे तुम्ही मला ‘उलगनायगन’ अशा नावाने हाक मारता. माझ्यासाठी इतर अनेक उपनावे देखील वापरली जातात. कोणाचाही अनादर न करता, मी वर नमूद केलेली सर्व उपाधी आणि इतर उपनावे सोडून देत आहे.”
पुढे ते लिहितात, ‘सहकलाकार आणि चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि कौतुकामुळे मी खूश आहे. तुझ्या प्रेमाने मी प्रभावित झालो आहे. यासाठी मी सदैव ऋणी आहे. कोणताही कलाकार त्याच्या कलेपेक्षा मोठा नसावा. एक कलाकार म्हणून मला जमिनीशी जोडलेले राहायचे आहे. मला माझ्या कलेशी जोडलेले राहायचे आहे. मला माझ्या कमतरतांची जाणीव आहे आणि मला पुढे जाण्याची इच्छा आहे.” यात अभिनेत्याने चाहत्यांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
एखाद्या मोठ्या सुपरस्टारने त्याच्या चाहत्यांना अशी विनंती करण्याची ही पहिलीच वेळ नाही. कमल हसन यांच्या आधी अजित कुमार यांनी ही पत्राद्वारे अशीच विनंती केली होती.
हेही वाचा:
Pune: २ लाख ८१ रुपयांचा गांजा व रिक्षा जप्त; खडकी पोलिसांची कारवाई