नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना गुजरातच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आली आहे. या रिक्तपदी भाजपचे ज्येष्ठ नेते कलराज मिश्रा यांची वर्णी लावण्यात आली असून त्यांच्यार हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दोन्ही राज्यपालांच्या नियुक्तीचे आदेश राष्ट्रपती यांनी आज जारी केले आहेत. दोघांनीही आपल्या राज्यांमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर नियुक्ती प्रभावी होईल. कलराज मिश्रा यांना मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाची स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली होती. 78 वर्षीय मिश्रा यांनी 2017मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपमधील 75 वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रीमंडळ आणि निवडणूकीपासून दूर राहण्याचे आदेश दिले होते.
उत्तर प्रदेशमधील देवरिया लोकसभा मतदार संघातुन ते 2014मध्ये विजयी झाले होते. त्यांनी बहुजन समाज पार्टीचे उमेदवार नियाज अहमद यांचा 2 लाख 65 हजार मतांनी पराभव केला होता. मात्र, यंदा त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही. याशिवाय ते तीन वेळा राज्यसभेचे खासदार व लखनऊमधुन भाजपाचे आमदार देखील राहिलेले आहेत.