पावसाळ्यात केसांची स्वतःची वेगळी समस्या असते. या काळात जास्त आर्द्रतेमुळे केस निर्जीव दिसू लागतात. अशा कोरड्या केसांना लपविण्यासाठी त्यांना बांधून कंटाळा आला असल्यास आता कल्की कोचलीनचे अनुकरण करण्याची वेळ आली आहे.
“द गर्ल इन यलो बूट’मधील अभिनेत्री कल्कीने आपले केस मेघानी रंगाने रंगविण्याचे ठरविले आणि तिला हे काम करण्यास अवघ्या 20 मिनिटांचा कालावधी लागला. कल्कीने ही संपूर्ण प्रक्रिया तिच्या मोबाइलवर शूट केली आहे. कल्कीने प्रथमच स्वतः आपले केस रंगविले आहेत.
कल्की म्हणते, मी ऐकले होते की डीआयवाय पद्धतीने केस रंगविण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे आणि तो खूप चांगला आहे. हे केसांना फक्त चांगलेच रंग देत नाही तर ते खरोखर चमकदार देखील बनवतात, असे तिने सांगितले.
दरम्यान, कल्कीने नुकातच आपल्या मुलीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात तिची मुलगी सप्पो ही तिच्या कुशीत असल्याचे दिसून येत आहे. हा फोटो शेअर करत तिने पोस्ट केले की, ब्रेस्टफिडींगला सहा महिने पूर्ण झाले आहेत. त्या सर्वांना “हॅप्पी ब्रेस्ट फिडींग विक’ जे या कठीण, पण सुंदर अशा मार्गावरून गेले आहेत.