आनंदाची बातमी : ओडिशी भाषेतील चित्रपट ऑस्करच्या मुख्य शर्यतीत

कलिरा अतीता : ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्रपातळीत होणारी वाढ हा विषय

नवी दिल्ली – निला माधव पांडाच्या ओडिशी भाषेतील “कलिरा अतीता’ या चित्रपटाने प्रतिष्ठित अकादमी पुरस्कार शर्यतीत प्रवेश केला असून सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणींत या चित्रपटाला नामांकन मिळाले आहे. ऑस्कर स्पर्धेत राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शकाच्या चित्रपटाची निवड केवळ ओडिया सिनेमासाठी महत्त्वाचा क्षण नव्हे तर भारतीय सिनेरसिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.

यापूर्वी गोव्यातील 51 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (आयएफएफआय) इंडियन पॅनोरामामध्ये या सिनेमाची निवड झाली होती. पिटोबॅश त्रिपाठी मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात हवामानातील बदलाचा आणि आपले कुटुंब समुद्रात गमावलेल्या एका मनुष्यावर कसा परिणाम होतो, यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील खेड्यांच्या पार्श्‍वभूमीवर या चित्रपटामध्ये हवामानातील बदल आणि समुद्राच्या वाढत्या पातळीच्या कठोर वास्तवावर जोर देण्यात आला आहे. पांडा त्याच्या चित्रपटांद्वारे पर्यावरणीय आणि सामाजिक चिंता व्यक्त करण्यासाठी प्रसिध्द आहे.

हा मोठा क्षण सामायिक करुन आपला आनंद व्यक्त करताना दिग्दर्शक निला माधव पांडा यांनी ट्‌विटरवर लिहिले की, आव्हानांनी भरलेल्या वर्षभरात # कालिरा अटिताने सामान्य प्रवेश प्रकारात ऑस्कर शर्यतीत प्रवेश केला आहे. सर्वोत्कृष्ट चित्र, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि इतर अनेक श्रेणी हे अकादमीच्या स्क्रीनिंगसाठी उपलब्ध करुन दिले जात आहे, सर्वांचे आभार.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.