पेठ वार्ताहर
पेठ – आंबेगाव तालुक्यातील अनेक मंदिरे सध्या काकडा आरतीने भल्या पहाटे सुमधुर आवाजाने दुमदुमलेली पाहायला मिळत आहे. सध्या थंडीचे प्रमाण वाढले आहे, तरी सुद्धा कडक थंडीत गावातील आणि वाड्या वस्यांवरील भाविक मोठ्या संख्येने पहाटे 4 ते साडेसहा या वेळात सहभागी होत आहेत. पहाटे अंघोळ करून मंदिरात आल्यानंतर देवाचे दर्शन घेतल्यावर टाळ, मृदंग ,भजन, वासुदेव ,आंधळा पांगळा, मुका बहिरा, जोगी गवळण आदी प्रकारची भजने मोठ्या भक्तिभावाने म्हटली जातात.
पेठ परिसरात वाड्यावस्तावर अनेक मंदिरे आहेत. त्या मंदिरात भाविक काकड आरत्या नियमीत म्हणत असतात.ह भ प दत्तात्रय काळे,गुलाब शिंदे,विश्वनाथ बुट्टे,गजानन बुट्टे,गजानन शिंदे,भागूबाई शिंदे,शिंधुबाई कुदळे,कमल पाचारणे,सुशीला बुट्टे आदी भाविक पेठ येथील श्री वाकेश्वर मंदिरात पहाटे जमतात, आणि स्पीकरच्या साहाय्याने टाळ मृदुंगाच्या साथीने विविध पद्धतीचे भावगीते साजरी करतात.
यामध्ये महिलांची उपस्थिती चांगली असते. भल्या सकाळी काकड आरतीने दुमदुमलेल्या थंडीत असे सुस्वर कानावर पडले की परिसरात आनंददायक वातावरण बनत आहे. कारेगाव, भावडी पेठ ,पारगाव परिसरात प्रत्येक मंदिरातून काकड आरतीचा आवाज घुमत आहे,