‘तान्हाजी’ चित्रपटातील काजोलचा लूक प्रदर्शित, पहा फोटो

मुंबई – ‘स्वराज्य’ निर्मितीच्या पवित्र कार्यात अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवकालीन इतिहासाच्या पानांवर या मावळ्यांचं कर्तृत्त्व सोनेरी अक्षरात कोरलं आहे. या मावळ्यांपैकी एक नाव म्हणजेच तानाजी मालुसरे. या मावळ्याच्या पराक्रमाची कथा बॉलिवूड अभिनेता अजय देवगण ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या रुपात रुपेरी पडद्यावर आणणार आहे.

या चित्रपटात अभिनेता अजय देवगण तानाजींची भूमिका साकारत असून सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तानाजी मालुसरे यांच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री काजोल दिसून येणार आहे. आज या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

अजय देवगणने आज ट्विट करत तिचा फोटो शेअर केला आहे. या ट्विटवरुन काजोल चित्रपटात तान्हाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, या चित्रपटात शरद केळकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे, तर राजमाता जिजाऊंची भूमिका पद्मावती राव वटवणार आहेत. चित्रपटातील सर्व कलाकारांचे लूक पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. उद्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. 10 जानेवारी 2020 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.