Kajol Viral Video| अभिनेत्री काजोल अनेकदा तिच्या स्पष्टवक्तेपणामुळेच आणि रागीट स्वभावामुळे चर्चेत असते. नुकतेच सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात काजोल तिच्या स्टाफवर ओरडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ती तिच्याच बॉडीगार्डला ढकलताना दिसत होती. आता पुन्हा एकदा तिचा असाच व्हिडिओ समोर आल्याने नेटकऱ्यांनी काजोलवर संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये काजोल घाईगडबडीत इमारतीच्या आत जाताना दिसत आहे. आत जाताच ती तिच्या एका कर्मचाऱ्यावर रागावते. ती त्याला काहीतरी बोलत बाहेर इशारा करत असल्याचे दिसते. तेव्हा कर्मचारी शांतपणे उभे राहून ऐकत असतो. या व्हिडीओवर यूजर्सच्या प्रतिक्रिया येत आहेत. Kajol Viral Video|
View this post on Instagram
यावरून अनेकांनी तिला जया बच्चन म्हंटले आहे. ‘ही जया बच्चन यांची कॉपी आहे,’ ‘ही छोटी जया बच्चन आहे,’ अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. दरम्यान, जया बच्चन देखील अनेकदा रागवताना दिसतात. त्यांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. Kajol Viral Video|
प्रोफेशनल फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर काजोल 2023 मध्ये ‘लस्ट स्टोरीज 2’ मध्ये दिसली होती. आता ती ‘दो पत्ती’ आणि ‘महाराणी : क्वीन ऑफ क्वीन्स’मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती ‘मा’ चित्रपटात दिसणार असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
हेही वाचा:
हरियाणात बसपासोबत युपीचा खेळ ; मायावती म्हणाल्या,’ पक्षाचे खूप नुकसान झाले, आता पुन्हा.. ‘