गोडसेने गांधीजींच्या शरिराची तर साध्वीने त्यांच्या आत्म्याची हत्या केली – कैलाश सत्यार्थी

नवी दिल्ली -साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना नथुराम गोडसे देशभक्त असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर बराच गदारोळ झाला होता. अखेर टीकेचा ओघ वाढल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी नमती भूमिका घेत माफीही मागितली आहे.

त्यानंतर नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर ट्विटरवरून टीका केली आहे. भाजपाने प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी कैलाश सत्यार्थी यांनी केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, गोडसेने गांधींच्या शरीराची हत्या केली. पण प्रज्ञा सारखे लोक आत्मा, अहिंसा, शांतता, सहिष्णूता आणि भारताच्या आत्म्याची हत्या करत आहेत. महात्मा गांधी हे सत्ता आणि राजकारणाच्या पलीकडे होते. भाजपाने छोटया फायद्याचा मोह सोडून त्यांना तात्काळ पक्षातून काढून राजधर्माचे पालन करावे असे सत्यार्थी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

https://twitter.com/k_satyarthi/status/1129603956999577600

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)