काबूल – अफगाणिस्तानात काबूल शहरातील एका शीख गुरूद्वारावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात 11 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. भारताचे नागरी विमान वाहतूक खात्याचे मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून त्यांनी म्हटले आहे की, अफगाणिस्तानातील अल्पसंख्याकांच्या हिताची मोठीच चिंता असून तेथील सरकारने त्यांच्या हिताची व सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे. दरम्यान, काबूलमधील गुरूद्वारा साहिबवर करण्यात आलेला हा हल्ला आत्मघाती स्वरूपाचा होता. तो नेमका कोणत्या गटाने केला आहे याची माहिती मात्र अजून मिळू शकलेली नाही.
या हल्ल्याच्या संबंधातील अधित तपशील अजून मिळू शकलेला नाही. या गुरूद्वारा सुरक्षा पुरवण्यात आली होती पण ती तोकडी होती. ही सुरक्षा भेदून तेथे हा हल्ला झाला आहे.