मुंबई- अभिनेता शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्सऑफीवर जोरदार कमाई केली आहे. प्रेक्षकांनी ‘कबीर सिंह’ चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्ब्ल 20.21 करोड रुपयांची जोरदार कमाई केली आहे. 2019 मधील सर्वात मोठी कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘कबीर सिंह’च्या देखील नावाचा समावेश झाला आहे.
#KabirSingh is terrific on Day 1… Emerges Shahid Kapoor’s biggest opener [surpasses *Day 1* biz of #Padmaavat: ₹ 19 cr]… Biggest *non-holiday* opening day of 2019 [surpasses #TotalDhamaal: ₹ 16.50 cr]… Is a craze amongst the youth… Fri ₹ 20.21 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) June 22, 2019
21 जून (शुक्रवार) रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, भारत तब्ब्ल 3123 स्क्रीन्स वर ‘कबीर सिंह’ चित्रपटत रिलीज झाला आहे. हा तेलगूमधील ‘अर्जुन रेड्डी’ चित्रपटचा हिंदी रिमेक आहे. अभिनेत्री कियारा आडवाणी देखील देखील चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येत आहे.