कबीर सिंगने 11 दिवसांत कमावले 190 कोटी

शाहिद आणि कियारा अभिनीत कबीर सिंग या चित्रपटाने 11 व्या दिवशी 9.07 कोटी रूपयांची कमाई करत नवा रेकॉर्ड स्थापन केला आहे. आकराव्या दिवशीची कमाई पहाता कबीर सिंगची एकूण कमाई 190.64 कोटी रूपये इतकी झाली आहे. चित्रपट करण्यापुर्वी शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांनी स्वत: ही कल्पना केली नसेल की त्यांचा सिनेमा कबीर सिंग बॉक्‍स ऑफिसवर इतकी दमदार कमाई करू शकेल.

शाहिदचा अभिनय आणि कियाराचा निरागसपणा प्रेक्षकांना इतका भावतोय की या सिनेमाचे सगळेच कौतुक करत आहेत. कबीर सिंग सिनेमा अपेक्षेपेक्षा अधिक कमाई करत आहे. तरुणाईमध्ये शाहिद कपूरच्या कबीर सिंगची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. यामुळेच या सिनेमाने जबरदस्त कमाई केली आहे. या सिनेमाने अक्षय कुमारच्या केसरीला मागे टाकले असून रणवीर सिंगच्या गली बॉयलाही मागे टाकले आहे.

सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर शुक्रवारी या सिनेमाने 20.21 कोटी, शनिवारी 22.71 कोटी, रविवारी 27.91 कोटी, सोमवारी 17.54 कोटी आणि मंगळवारी 16.53 कोटी रूपये कमावले होते. बुधवारी या सिनेमाने 15.91 कोटी रुपये, गुरूवारी 13.61 कोटी रूपये कमावले. दुसऱ्या शुक्रवारी या सिनेमाने 12.21 कोटी रूपये, शनिवारी 17.10 कोटी रूपये, रविवारी 17.84 कोटी रूपयांची कमाई केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.