मुबई- कबीर सिंग फेम अभिनेत्री ‘कियारा अडवाणी’ इंडस्ट्रीतल्या उत्कृष्ट अभिनयासह ती तिच्या उत्तम ड्रेसिंग सेन्ससाठी देखील ओळखली जाते. तिने आतापर्यंत बर्याच भूमिका साकारल्या आहेत. आज म्हणजेच 31 जुलै रोजी कियारा अडवाणीचा वाढदिवस आहे.
एका प्रसिद्ध वृत्तानुसार बॉलिवूडचा भाईजान सलमान खानमुळे तिला आपले नाव बदलावे लागले. कियाराचे खरे नाव ‘आलिया आडवाणी’ असे आहे. तसेच, आधार कार्ड व पासपोर्टवर तिचे नाव आलिया आडवणी असे आहे.
कियाराने 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या फ़गली या चित्रपटातून कलाविश्वात आपले पाऊल टाकले. त्यानंतर 2016 मध्ये आलेला एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसून आली. या दोन्ही चित्रपटामुळे तिला म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही.
मात्र, कियारा कबीर सिंग चित्रपटानंतर अक्षरशः रातोरात स्टार बनली. या चित्रपटातील कियाराची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली असून या चित्रपटातील तिच्या लूक्सची देखील चांगलीच चर्चा झाली.