बेळगाव- जेष्ठ विचारवंत आणि लेखक डॉ.एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने बेळगावमधून एकाला अटक केली आहे. ‘प्रवीण चतूर’ असं या अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी एसआयटीने चौकशीसाठी प्रवीणला ताब्यात घेतले होते. मात्र त्यावेळी त्याची चौकशीकरून त्याला सोडून देण्यात आले होते. परंतु यावेळी प्रवीणला अटक करण्यात आले आहे. दरम्यान, प्रवीणची अटक झाली असून न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
डॉ.एम.एम. कलबुर्गी यांची 30 ऑगस्ट 2015 रोजी धारवाडच्या कल्याण नगरमध्ये त्यांच्या घराजवळ कलबुर्गी यांची हत्या झाली होती.