कॉ.पानसरे हत्या प्रकरण : शरद कळसकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील औरंगाबादच्या केसापुरी गावचा नववा संशयित आरोपी शरद भाऊसाहेब कळसकरची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कोल्हापूर SIT ने शरद कळसकर ची पोलीस कोठडी संपल्याने आज न्यायालयात हजर केलं होतं. यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांनी कळसकरची 8 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

Posted by Digital Prabhat on Monday, 24 June 2019

शरद कळसकर याच्याकडून पोलीस कोठडी दरम्यान SIT ला गेल्या 14  दिवसांमध्ये महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. त्याची प्रत आज न्यायालयात सादर करण्यात आली. दरम्यान आज न्यायालयात कोणत्याही प्रकारचा युक्तीवाद सरकारी पक्ष आणि आरोपी पक्षा तर्फे सदर करण्यात आला नाही. कळसकर न्यायालयात हजर करताच काही मिनिटांत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांनी त्याची 8 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केलीय.

Leave A Reply

Your email address will not be published.