ज्योतिरादित्य सिंधियांचा कॉंग्रेस सरचिटणीस पदाचा राजीनामा

नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पदाचा राजीनामा दिल्यानंतर कॉंग्रेसमध्ये राजीनाम सत्र सुरू झाले असून कॉंग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सरचिणीस पदाचा राजीनामा दिला आहे. याची माहिती त्यांनी स्वतः ट्‌विवटरवरून दिली आहे.

ट्विटमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटले आहे की, लोकांचा निर्णय स्वीकारत आणि त्याची जबाबदारी घेत, मी राहुल गांधी यांना माझा अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा सादर केला आहे.

मला ही जबाबदारी आणि आमच्या पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या अगोदर मिलिंद देवरा यांनी मुंबई कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. अवघ्या चार महिन्यांपूर्वीच त्यांना मुंबई कॉंग्रेसची जबाबदारी देण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.