मिलान – युव्हेंटसने इंटर मिलानविरुद्ध परतीच्या लढतीत गोलशून्य बरोबरी पत्करली तरी 2-1 अशा गोलफरकाच्या जोरावर त्यांनी इटालियन करंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत मजल मारली.
युव्हेंटसने सात वर्षांत सहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. ऍरटलांटा आणि नापोली यांच्यात बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. अंतिम लढत 19 मे रोजी रंगणार आहे.
इंटर मिलानला सलग दुसऱ्या वर्षी उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. युरोपातील अन्य लीग स्पर्धेत मॅंचेस्टर युनायटेडने सलग सातव्या वर्षी एफए कप फुटबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.