बार्सिलोना – जुव्हेंट्सचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने बार्सिलोनाच्या लिओनेल मेस्सीचे आव्हान परतवून लावताना दोन अफलातून गोल केला. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर जुव्हेंट्सने बार्सिलोनाला 3-0 असे सहज पराभूत केले.
या दोन दिग्गज खेळाडूंदरम्यानचा स्पॅनिश फुटबॉल स्पर्धेतील हा हायव्होल्टेज सामना गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चिला जात होता. त्यात अखेर रोनाल्डोनेच बाजी मारली. बार्सिलोनाचा घरच्या मैदानावरील सात वर्षांनंतरचा हा पहिलाच पराभव ठरला.
स्पॉट कीकचे रूपांतर पेनल्टीमध्ये करत रोनाल्डोने 2 गोल केले. यातील दुसरा गोल करताना त्याने मेस्सीलाही सातत्याने चकवले व आपला दबदबा सिद्ध केला. रोनाल्डोने सामना सुरू झाल्यानंतर 13 व्या मिनिटालाच पहिला गोल केला. त्यानंतर त्याने केलेल्या पासवर वेस्टर्न मॅककेनी याने 20 व्या मिनिटाला गोल केला व संघाला पहिल्या हाफमध्येच 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.
दुसरा हाफ सुरू झाल्यावर मेस्सीसह बार्सिलोनाच्या सर्वच खेळाडूंनी जोरदार आक्रमण केले. मात्र, युव्हेंट्सच्या संघाने ते लिलया थोपवले. त्याच वेळी 52 व्या मिनिटाला रोनाल्डोने आणखी एक गोल करत संघाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.
उर्वरित खेळात बार्सिलोनाचे गोल करण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले व युव्हेंट्सने हा सामना जिंकला. या विजयाच्या जोरावर त्यांनी ग गटात पहिले स्थान मिळवताना 15 गुणांची नोंद केली. विजयानंतर युव्हेंट्स तर पराभवानंतरही अव्वल गुण असल्याने बार्सिलोना यांनी बाद फेरीत प्रवेश केला. या सामन्यातील पराभवामुळे घरच्या मैदानावरची सलग 38 सामने जिंकण्याचा बार्सिलोनाची वाटचाल खंडित झाली.