सिंहगडरस्ता – सिंहगड रस्त्यावर नांदेड सिटी समोर आरएमसी प्लांट आहे. या प्लांटमधून शहराच्या विविध भागात ट्रक जात असतात. प्लांटच्या समोर अगदी रस्त्यापर्यंत सिमेंट मिश्रित धुरळा पसरत आहे.
या प्लांटमुळे या परिसरात हवेत धुलीकरण मिसळत असल्याने प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे. याचा त्रास होत असल्याची नागरिक करू लागले आहेत. दोन प्लांट वरील ट्रक तसेच यांना खडी आणि वाळूचा पुरवठा करणारे डंपर यांची सतत ये-जा येथे सुरू असते बरेच वेळा हे ट्रक चालक विरुद्ध दिशेने ट्रक चालवत प्लांटमध्ये शिरतात, त्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे, असल्याने हे प्लांट इतरत्र स्थलांतरित करावेत, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.
संबंधित प्लांट धारकांना या संदर्भात विचारले असता व्यवस्थापकांनी सांगितले की, प्रदूषण रोखण्यासाठी आणि स्थानिक नागरिकांना त्रास न होण्यासाठी आम्ही योग्य ती काळजी आणि उपाययोजना करीत असतो. तरीही नागरिकांना त्रास होत असेल तर त्वरित यावर आम्ही उपाययोजना करू.
आरएमसी प्लांटमुळे जर प्रदूषण होत असेल तसेच याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असेल तर अशा प्लांटची पाहणी करून त्यांना याबाबतचे नियम सांगितले जातील, त्यानंतरही संबंधीत प्रशासनाने याची दखल घेत प्रदूषण रोखले नाही तर कडक कारवाई करण्यात येईल. – प्रताप जगताप,
अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ