जस्सीचे कम बॅक

छोट्या पडद्यावर काही वर्षांपूर्वी एक शो होता. जस्सी जैसी कोई नहीं…हे त्याचे नाव. मोना सिंहने त्यात जस्सीचा रोल केला होता. कोणतेही कपट नसलेली, एका साधारण कुटुंबातील साधारण मुलगी तिने साकारली होती. तिचे हे काम लोकांना खूप आवडले आणि जस्सीने मोनाला अमाप प्रसिद्धी मिळवून दिली.

3 इडियट्‌ससारख्या चित्रपटांतही ती नंतर झळकली. त्यानंतर गेली पाच वर्षे ती गायब होती. तिचे लग्न झाले अन्‌ ती सुखाचा संसार करतेय. मात्र, कलाकाराला त्याच्यातील कलाकार स्वस्थ बसू देत नाही हेच खरे.

त्याचे कारण आता पाच वर्षांनंतर मोना पुनरागमन करते आहे. तेही छोट्या पडद्यावर. मौका ए वारदात नावाचा तिचा एक रिऍलिटी शो लवकरच येत असून त्याचे शूटिंगही आता सुरू केले जाणार असल्याचे मोनाने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. मोना म्हणते की, तिला क्राइम स्टोरीजमध्ये काम करायला पूर्वीपासून आवडत होते. सोनीच्या सगळ्यांत गाजलेल्या सीआयडी मालिकेतही ती होती. त्यामुळे तिला या प्रकाराच्या कार्यक्रमांचा अनुभवही आहे.

भोजपुरी सुपरस्टार आणि लोकसभेचा खासदार असलेले रवि किशन यांच्यासोबत मोना हा नवा शो होस्ट करणार आहे. खरेतर या शोसाठी अगोदर रश्‍मी देसाईचे नाव फायनल झाले होते. तिच्याशी याबाबत चर्चाही झाली होती. मात्र, मोनाला असलेला असल्या शोचा अनुभव आणि महत्त्वाचे म्हणजे कमबॅक करण्याची तिची तयारी हे तिचे प्लस पॉइंट ठरले. त्यामुळे आता तिचे जोरदार पुनरागमन होणार असल्याची खात्री बाळगायला हरकत नाही. तिच्या चाहत्यांसाठी ही खरेच गुड न्यूज आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.