मुंबई – कोरोना व्हायरसचा भारतात फैलाव झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही सेवा सुरू नाहीयेत.
दरम्यान, या अशा परिस्थिती पोलिस देखील दिवसातील कित्येत तास काम करत आहेत. काम करताना कोरोनाची लागण देखील होऊ शकते याची त्यांना चांगली कल्पना असली तरी ते आपले काम खूपच चांगल्याप्रकारे करताना दिसत आहे.
त्यांच्या या कामासाठी बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अभिनेता ‘अजय देवगण’ याने ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलिसांचे कौतुक केले आहे.
अजय म्हणाला कि, ‘प्रिय मुंबई पोलिस, तुम्ही जगातील सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखले जाता. सध्या भारतात कोरोनाने मोठे थैमान घातले आहे. या कठीण परिस्थिती तुम्ही जे काम करत आहात ते अतुलनीय आहे. आपण मला हाक द्या, हा ‘सिंघम’ आपली ‘खाकी’ वर्दी घालून आपल्या बाजूला उभा राहील. जय हिंद… जय महाराष्ट्र…’ असं अजय देवगण म्हणाला आहे.
Dear Mumbai Police, you are known as one of the BEST in the world. Your contribution to the COVID-19 pandemic is unparalleled. Singham will wear his Khakee and stand beside you whenever you ask. Jai Hind, Jai Maharashtra 🙏@CPMumbaiPolice @MumbaiPolice
— Ajay Devgn (@ajaydevgn) April 9, 2020
#TakingOnCorona @MumbaiPolice https://t.co/VcL51e6MWQ
— Ajay Devgn (@ajaydevgn) April 8, 2020