जुन्नरच्या तिघींची करोनावर मात

जुन्नर -जुन्नर तालुक्‍यातील 22 करोनाबधितांपैकी तिघीजणी उपचारानंतर घरी परतल्या आहेत. धोलवड येथील माय-लेकीने करोनावर यशस्वीपणे मात केल्याची सुखद बातमी आहे. तर यापुर्वी डिंगोरे येथील करोनाबाधित महिला उपचारानंतर बरी होऊन घरी परतली आहे.

त्यामुळे तालुक्‍यातील करोना संसर्गातून बरे होणाऱ्यांची संख्या तीन झाली आहे. औरंगपूर येथील एका पुरुषाचा मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता तालुक्‍यातील करोनाबधितांचा आकडा 18 वर आला आहे.

सध्या तालुक्‍यात धोलवड 1, सावरगाव 5, मांजरवाडी 2, खिलारवाडी 1, पारुंडे 3, आंबे गव्हाण 2, धालेवाडी तर्फे मिन्हेर 1, विठ्ठलवाडी (वडज) 1 तर शिरोली तर्फे आळे येथे 2 असे एकूण 18 रुग्ण करोनाबाधित आहेत. तर लेण्याद्री येथील कोविड केअर सेंटर मध्ये आजअखेर (दि. 1) 69 रुग्णांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली आहे.

तर तालुक्‍यात एकूण 10 कंटेन्मेंट झोन असून 88 टीम सर्व्हेक्षणाचे काम करत आहेत. शहरातून आलेल्या नागरिकांनी माहिती लपविल्यास किंवा क्वारंटाइन न झाल्यास सक्त कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.