जुन्नर -जुन्नर तालुक्यात बुधवारी 23 गावांत नव्याने 59 जणांचे करोनाअहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर सलग तिसऱ्या दिवशी तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जुन्नर तालुक्यात एकूण रुग्णसंख्येत वाढ होऊन 19 हजार 572 झाली आहे. तर 18 हजार 268 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. 633 रुग्णांचा मृत्यू झाला असून 671 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
ओतूरमध्ये सर्वाधिक 9 रुग्ण आढळले असून, त्याखालोखाल नारायणगाव 6, वारुळवाडी, धोलवड, बोरी बुद्रुक प्रत्येकी 5, राजुरी 4, जुन्नर शहर, उदापूर प्रत्येकी 3, आळे, निमगाव सावा, शिरोली तर्फे आळे, पारगाव तर्फे आळे प्रत्येकी 2, वडगाव आनंद, निरगुडे, हिवरे तर्फे
नारायणगाव, खोडद, धनगरवाडी, हिवरे खुर्द, वडगाव कांदळी, जाधववाडी, गुंजाळवाडी आर्वी व येणेरेत प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून व्यापक उपाययोजना राबविल्या जात आहेत. तसेच संसर्ग रोखण्यासाठी सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.