ओझर : देशाचे नेते शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळेच जुन्नर तालुक्यात ५ धरणे होऊन हा तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटला. अनेक त्यांना नेते मडळी त्यांना सोडून गेली. मात्र जुन्नर तालुक्यातील सर्व जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली. आजही शरद पवार यांचे या तालुक्यावर तेच प्रेम आणि तोच विश्वास कायम असून लोकसभा निवडणुकीत जनतेने मतातून हे दाखवून दिले आहे.
लोकसभेप्रमाणे विधानसभेला हि जुन्नर तालुका महाविकास आघाडी सोबत आहे असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशिल शेरकर यांनी प्रचारा दरम्यान आदिवासी भागातील दौऱ्यात केला. महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशिल शेरकर यांनी पाडळी,कातकरी वस्ती, माणिकडोह, खामगाव गावठाण, खामगाव कॉलनी, शिवेचीवाडी राजूर नंबर १ व नंबर २, हडसर, मुदेवाडी, पेठेचीवाडी उंडेखडक, केवाडी, निमगिरी, खांडीचीवाडी, रानचरी, खटकाळे, खैरे, हिरडी, देवळे चिंचेचीवाडी अंजनावळे, तळ्याचीवाडी, घाटघर, जळवंडी, फांगुळगव्हाण, खडकुंबे, उसरान या गावातील मतदारांशी संवाद साधला.
यावेळी याप्रसंगी जिल्हा बँकेचे माजी संचालक तुळशिराम भोईर, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन अशोक घोलप, कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, जुन्नरचे माजी नगराध्यक्ष सुनिल मेहेर, माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा मुंढे, देवेंद्र खिल्लारी, बाजीराव मानकर, चंद्रकांत तळपे, कावळा गागरे , रविंद्र काटकर, सिताराम खिल्लारी , राजुर न.१ गावच्या सरपंच ज्योत्स्ना मुंढे, उपसरपंच शांताराम मुंढे, शशिकांत घायतोडके आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
शेरकर पुढे म्हणाले कि, पाण्याचे आंदोलन असेल , कांदा आंदोलन असेल, कोरोनाच्या काळात श्री विघ्नहर कारखान्याच्या माध्यमातून २०० बेडचे हॉस्पिटलचे केलेले काम असेल, पठार भागातील चारा छावण्यासाठी चारा पाठविला असेल. हे सर्व काम राजकारणात नसताना सामाजिक बांधिलकीतून केले आहे. प्रचार निमित मतदारांशी संवाद साधताना अनेक प्रश्न दिसून येत आहे.
रात्याचे प्रश्न असतील, रोजगाराचे, महिलांचे प्रश्न असतील. या निवडणुकीनंतर शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्या विचाराचा मुख्यमंत्री होणार आहे. या भागतील सर्व सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे आश्वासन सत्यशील शेरकर यांनी दिले.
यावेळी अशोक घोलप, सुरेखा मुंढे, कावा गागरे, तुळशीराम भोईर, देवेंद्र खिल्लारी, बबन घोलप, अविनाश घोलप, मचीन्द्र कबाडी, अरुण पापडे, बाळू घोलप, सोपान घोलप, चंद्रकांत तळपे, शांताराम मुंढे, ज्योत्स्ना मुंढे आदींनी मतदारांशी संवाद साधला.