गांधी जयंतीदिनी अवैधरित्या गोवंश हत्याविरोधात जुन्नर पोलिसांची दबंग कारवाई

जुन्नर (प्रतिनिधी) – येथील अवैधरित्या गोवंश हत्याविरोधात आज पीआय युवराज मोहिते नेतृत्वाखाली जुन्नर पोलिसांनी दबंग कारवाई केली. यामध्ये अवैधरित्या कत्तल केलेल्या गोवंश जातीच्या जनावरांची १२ शिंगे, अंदाजे ५० किलो आतडी व अंदाजे ३० किलो चरबी आणि मुद्देमाल आढळून आला. त्याचप्रमाणे कत्तलीसाठी आणलेली ८ जनावरे ताब्यात घेण्यात आली आहे.

जुन्नर शहरातील खलीलपुरा पेठेतील एका घराशेजारील खोलीमध्ये गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती पीआय युवराज मोहिते यांना मिळाली. यानंतर जुन्नर पोलिसांनी सकाळी ७:३० वाजता त्वरित घटनास्थळी कारवाई केली. परंतु, त्यापूर्वीच संबंधितांनी जनावरांचे मांस लंपास केले होते.

या धडक कारवाईत गाई-बैल अशी एकूण ८ जनावरे ताब्यात घेण्यात आली. यापूर्वी देखील याच भागात जुन्नर पोलिसांनी नगरपालिकासह मोठी कारवाई करत अनेक अवैध कत्तलखाने उद्धवस्त केले होते.

दरम्यान, पीआय युवराज मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय मिलिंद साबळे, पीएसआय स्मिता नवघरे, पीएसआय ज्ञानेश्वर बेंद्रे व पोलिसांनी कारवाई केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.