Naib Tehsildar Death : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बनकरफाटा-जुन्नर मार्गावर भीषण अपघात झाला असून, यात जुन्नरचे नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी (५२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अपघाताबाबत विविध शंका व्यक्त केल्या जात आहेत. (Naib Tehsildar Death) मिळालेल्या माहितीनुसार, गणपती फाट्याजवळील एस कॉर्नर परिसरात हा अपघात घडला. अनंता गवारी हे महसूल अधिकाऱ्यांची होंडा सिटी कारने बनकरफाट्याहून जुन्नरकडे जात होते. त्याचवेळी पांगरीमाथ्याकडून येणाऱ्या हायवा ट्रकची कारशी समोरासमोर जोरदार धडक झाली. (Naib Tehsildar Death) धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला आणि वाहन उलट दिशेला फिरले. या अपघातात अनंता गवारी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारासाठी पुण्याकडे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. (Naib Tehsildar Death) या अपघातात विजय खारतोडे (४८) आणि तुषार भीमराव कोरडे (३५, सर्व रा. जुन्नर) हेही जखमी झाले असून, खारतोडे यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तुषार कोरडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना बाहेर काढले आणि ओतूर येथील निरामय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना पुण्याकडे हलविण्यात आले. (Naib Tehsildar Death) घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी तत्काळ नियंत्रण मिळवत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, अपघातातील हायवा ट्रक मांदारणे येथील ‘विघ्नहर्ता खडी केशर अँड पेवर्स’ या कंपनीचा असल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. (Naib Tehsildar Death)