बेल्हे (प्रतिनिधी) :- जुन्नर तालुक्यातील बेल्हे परिसरात रविवारी सायंकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नद्या-नाल्यांना पूर आला होता. या पुरातून मोटारसायकल वरून पूल पार करणे दोन बहाद्दरांना चांगलेच महागात पडले.
हे दोघे कल्याण- नगर महामार्गापासून गणेशनगर कडे जात होते. पुराच्या पाण्याच्या प्रचंड वेगामुळे ते मोटरसायकल सह वाहून गेले.
दैवबलत्तर म्हणून दोघे बचावले. दत्ता गुंजाळ व घुले असं या दोघांच नाव असून दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.