सारंग कोडोलकर निवडणूक अधिकारी
खोडद- जुन्नर विधानसभा निवडणुकीसाठी एकूण केंद्र 356 मतदान आहेत. जुन्नर तालुक्यातील एकूण मतदार 2 लाख 99 हजार 648 मतदानाचा हक्क पार पाडणार आहेत. जुन्नर विधानसभेची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार हनुमंत कोळेकर, उपविभागीय अधिकारी दीपाली खन्ना, पोलीस निरीक्षक पी. वाय. मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, गटविकास अधिकारी विकास दांगट,महेंद्र पाटील यांनी नियोजन केले आहे.
निवडणूक प्रक्रियेसाठी झोनल अधिकारी, केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी अशा एकूण 2200 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय संबंधित मतदान केंद्रावरील केंद्रस्तरीय अधिकारी, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, तलाठी अशा विविध स्तरांवरील कर्मचाऱ्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जुन्नर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक नायब तहसीलदार सचिन मुंढे, निवडणूक लिपीक संजय अहिरे, अनिल थोरावडे, अर्जुन लांडे, स्वप्नील दप्तरे आणि सर्व महसूल कर्मचारी, तसेच पंचायत समिती कर्मचारी कार्यरत आहे.