Junk Foods: जंक फूड्स इम्युनिटी वाढवू शकतात का? जाणून घ्या कोणते पर्याय ठरू शकतात फायदेशीर

Junk Foods: सामान्यतः चिप्स, पिझ्झा, बर्गर, मॅकरोनी अशा जंक फूड्सना हानिकारक समजले जाते कारण यात साखर, मीठ, फॅट्स आणि कॅलरी जास्त प्रमाणात असतात. मात्र न्यूट्रिशनल थेरपिस्ट एवी व्हाईटहेड यांच्या मते, काही जंक फूड्स योग्य पद्धतीने बनवले गेले आणि मर्यादित प्रमाणात खाल्ले, तर ते इम्युनिटी वाढविण्यास मदत करू शकतात.
चला जाणून घेऊया कोणते जंक फूड्स आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात:
मार्गेरिटा पिझ्झा
टमाटर सॉसमध्ये लाइकोपीन मुबलक असते, जे एक ताकदवान अँटीऑक्सिडंट आहे आणि इम्युन सेल्सचे रक्षण करते. मोजरेला चीजमध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन B12 असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पिझ्झावर ओरेगॅनो टाकल्यास सूज कमी करण्यास व इन्फेक्शनपासून संरक्षण करण्यास मदत होते.
बर्गर
उत्तम क्वालिटीचा बीफ बर्गर झिंकचा मोठा स्त्रोत आहे. झिंक टी-सेल्स सक्रिय करून शरीरातील संसर्गाशी लढायला मदत करतो. जखमा भरून काढण्यातही उपयुक्त ठरतो.
करी
हिवाळ्यात सर्दी-फ्लूपासून वाचण्यासाठी करी प्रभावी ठरते. यात असलेले आले (जिंजरॉल कंपाउंड) व्हाइट ब्लड सेल्स सक्रिय करते. मसाले शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करतात व सूज कमी करतात.
गार्लिक ब्रेड
लसूण कापल्यावर किंवा कुसकरल्यावर त्यातून ‘अलिसिन’ तयार होते, जे इम्युनिटी मजबूत करते. यात अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यात मदत करतात.
चिली कॉन कार्ने
या डिशमध्ये राजमा (फायबर व प्रोटीनचा स्त्रोत), बीफ (झिंक आणि प्रोटीन), तसेच टमाटर (लाइकोपीन) असतात. राजमा शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढतो व आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियाला पोषण देतो. त्यामुळे इम्युनिटी वाढते.
बेक्ड बीन्स
यात प्रोटीन, फायबर आणि बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स असतात. हे इम्युन सेल्स नीट काम करण्यास मदत करतात व शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात.
मॅकरोनी अँड चीज
चीज झिंकचा उत्तम स्त्रोत आहे, जो इम्युन सेल्स सक्रिय करतो. ड्युरम व्हीटची मॅकरोनी सामान्य गव्हाच्या तुलनेत जास्त प्रोटीन देते आणि पचायला फायदेशीर ठरते.
ब्लूबेरी मफिन
ब्लूबेरी व्हिटॅमिन C, फ्लेव्होनॉयड्स आणि अँथोसायनिन्सने समृद्ध असतात, जे व्हायरसशी लढायला मदत करतात. होल व्हीट पिठाचा वापर केल्यास फायबर आणि बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स मिळतात.
चिप्स व फिश अँड चिप्स
आलूमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम व व्हिटॅमिन C असतात. त्यातील ‘रेझिस्टंट स्टार्च’ पोटातील चांगले बॅक्टेरिया मजबूत करतो. फिशमधील ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि प्रोटीन इम्युनिटी वाढवतात. तसेच फिशमधील व्हिटॅमिन A रोगप्रतिकारक शक्तीला बळकट करते.
निष्कर्ष असा की, सर्व जंक फूड वाईट नसतात. योग्य घटक वापरून आणि मर्यादित प्रमाणात खाल्ले तर काही जंक फूड्सही आपली इम्युनिटी वाढविण्यास मदत करू शकतात.





