ज्युनियर पांड्याचा फोटो व्हायरल

मुंबई  –  बॉलीवूड अभिनेत्री नताशा स्टॅन्कोव्हिचने गुड न्यूज दिली असून भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या घरी ज्युनिअर हार्दिकचे आगमन झाले आहे. हार्दिक पंड्याने स्वत: आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. सध्या सोशल मीडियावर ज्युनियर पांड्याचा फोटो व्हायरल चांगलाच वायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

The blessing from God 🙏🏾❤️ @natasastankovic__

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅन्कोव्हिच याबाबत आपल्या चाहत्यांना वेळोवेळी माहिती देत होते. त्यानंतर काही दिवसात नताशा गर्भवती असल्याची माहिती हार्दिकने सोशल मीडियावर दिली होती.

 

View this post on Instagram

 

We are blessed with our baby boy ❤️🙏🏾

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

आता हार्दिक पंड्या आपल्या मुलाचं नाव काय ठेवणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. मात्र, त्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हार्दिकने नताशा स्टॅन्कोव्हिचसोबत साखरपुडा केल्याचेही सोशल मीडियावर जाहीर केले होते. हार्दिकने साखरपुडा केल्याची माहिती त्याच्या घराच्यांनाही नव्हती. त्यानंतर मे महिन्यात नताशा गर्भवती असल्याचे हार्दिकने सांगितले होते आणि सोबत लग्नाचा फोटोही शेअर केला होता. लॉकडाऊनमुळे हा सोहळा अत्यंत खासगी होता.

 

View this post on Instagram

 

💝 Photographer- @rahuljhangiani Hardik’s stylist – @nikitajaisinghani Natasa’s stylist – @begborrowstealstudio

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

हार्दिकने इन्स्टाग्रामवर गर्लफ्रेंड नताशाचे बेबी बंपसोबतचे फोटो शेअर केले होते. सोबतच आपल्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचे स्वागत करण्यास उत्साहित असल्याचे त्याने लिहिले होते. यासोबतच एका पारंपरिक सोहळ्याचेदेखील फोटो त्याने शेअर केले होते. ज्यामध्ये हार्दिक आणि नताशा या दोघांच्या गळ्यामध्ये वरमाला दिसत होती, आता याचा अर्थ नेमका काय घ्यावा हे मात्र हार्दिकने चाहत्यांवरच सोडले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.