साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर ॲक्शन ड्रामा फिल्म देवरा चा भाग 1 मधील दुसर गाणं रिलीज झाले आहे. या गाण्यात ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरची केमेस्ट्री दिसून येत आहे. ज्युनियर एनटीआरचे चाहते देवरा भाग १ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
या चित्रपटाचा ट्रेलर अद्याप रिलीज झालेला नाही. या चित्रपटातून ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरची फक्त झलक दिसली आहे. त्याच वेळी, चित्रपटातील एक गाणे रिलीज झाले आहे, ज्याला यूट्यूबवर 100 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आता दावूदी हे या चित्रपटातील आणखी गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात जान्हवी तिच्या डान्स स्टेपने सर्वांचे लक्ष वेधून घेतांना दिसत आहे. तर ज्युनियर एनटीआर डान्स स्टेपने चाहत्यांना वेड लावले आहे.
दाऊदी गाणे नकाश अजीज, आकाशा आणि रम्या बेहरा यांनी गायले आहे. गाण्याचे बोल रामजोग्य शास्त्री, मुनीर कौसर आणि विघ्नेश शिवन, वरदराजा चिकन बल्ला पुरा आणि मनकोम्बू गोपालकृष्ण यांनी लिहिले आहेत. दाऊदी हे गाणे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील तरुण संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीतबद्ध केले आहे.
दरम्यान, ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खान स्टारर चित्रपट देवरा पार्ट 1 कोरतला सिवा यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटातून जान्हवी कपूर आणि सैफ अली खान दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. चालू महिन्यात 27 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि सैफ अली खान यांच्यात चुरशीची स्पर्धा असणार आहे. ज्युनियर एनटीआर आणि सैफ अली खान आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ असेल. आरआरआर (२०२२) या चित्रपटानंतर, ज्युनियर एनटीआर देवरा भाग १ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर येत आहे.