ज्युनियर व कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत मनुष, रिगनला कांस्यपदक

बेल्जियम – भारताचा युवा खेळाडू मनुष शाह आणि रिगन अल्बुक्‍युरेक्‍यु यांनी बेल्जियम ज्युनियर व कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत कांस्यपदकावर नाव कोरले. ही स्पर्धा आयटीटीएफ ज्युनियर सर्किट प्रिमियमचा भाग आहे. या दोन खेळाडूंनी इराणच्या अमिन अहमदीन आणि रादीन खय्याम सोबत जोडी बनवून मुलांच्या ज्युनियर सांघिक गटात सर्वोत्तम खेळ केला.

भारत व इराणच्या या जोडीला स्थानिक ऍड्रिअन रासेनफोस, निकोलस डेग्रोस आणि ओलाव कोसोलोस्कीविरुद्ध फारशी चमक दाखवता आली नाही. इराणच्या अमिन अहमदीनला (0-3) ऍड्रियनने पहिल्या सामन्यात पराभूत केले. पण, मनुष शाहने ओलाव कोसोलोस्कीला 3-1 अशा फरकाने पराभूत करत आगेकूच केले.

रिगन अल्बुक्‍युरेक्‍युला निकोलस डेग्रोसने चुरशीच्या लढतीत 1-3 अशा फरकाने पराभूत केले. जागतिक क्रमवारीत 21व्या स्थानी असलेल्या (18 वर्षाखालील) मनुषने ऍड्रिअन रासेनफोसवर 3-1 अशा फरकाने विजय नोंदवला. यानंतर इराणच्या अमिनने ओलावला 3-2 असे नमवित उपांत्यफेरीत धडक मारली.

उपांत्यफेरीत भारत व इराण यांच्या मिश्रित संघाचा सामना जपानच्या रोईछी योशियामा आणि ताकेरु काशिवा, न्युझीलंडच्या नॅथन जू सोबत होता. यामध्ये इंडो-इराणियन संघाला 0-3 असे पराभूत व्हावे लागल्याने त्याने कांस्यपदकाची कमाई केली. मुलींच्या ज्युनियर सांघिक गटात मनुश्री पाटील, स्वस्तिका घोष व ग्वाटेमालाच्या लुशिया कोर्डेरो यांचा चीन तैपेईच्या संघासमोर निभाव लागला न लागल्याने उपांत्यपूर्व फेरीत त्यांचे आव्हान संपुष्टात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.