मुंबई – हॉलीवूडच्या रसिक प्रेक्षकांसाठी एक चांगली बातमी आहे.’जंगल क्रूझ’ चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या डिज्नेच्या पोस्टरमध्ये ड्वेन जॉन्सन आणि इमिली ब्लन्ट क्रूझवर सफर करताना दिसत आहेत. या चित्रपटाचा थरारक ट्रेलरदेखील रिलीज करण्यात आला आहे.
Dwayne Johnson #TheRock and Emily Blunt… #JungleCruise to open in #Indian theaters on 24 July 2020. pic.twitter.com/eHll3fg65Z
— taran adarsh (@taran_adarsh) October 12, 2019
जाउम कोलेट – सेर्रा दिग्दर्शित या चित्रपटात ड्वेन जॉन्सन क्रूझचा कॅप्टनच्या भूमिकेत आहे. तर इमिली ब्लन्ट रिसर्चसाठी क्रूझवर दाखल झाली आहे. यांच्यासोबत एडगर रॅमिर्झ, जॅक व्हाईटहाल, जेस्से प्लेमोन्स आणि पॉल जिएमॅटी यांच्या भूमिका आहेत . २४ जुलै २०२० मध्ये हा चित्रपट भारतासह जगभर प्रदर्शित होईल.