Khushi Kapoor And Junaid Khan | बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खानने ‘महाराज’ चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे देखील खूप कौतुक करण्यात आले होते. यानंतर आता जुनैद दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी खुशी कपूरसोबत एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक रोमँटिक चित्रपट असणार आहे.
निर्मात्यांनी सोशल मीडियावर मंगळवारी याची घोषणा केली आहे. मात्र अद्याप या चित्रपटाचे नाव समोर सांगण्यात आले नाही. निर्मात्यांनी सोशल मीडियावर जुनैद खान आणि खुशी कपूरला टॅग करत पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘तुम्ही डिजीटल काळातील प्रेम अनुभवण्यास तयार आहात का? अद्वैत चंदन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०२५ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.’ Khushi Kapoor And Junaid Khan |
अद्वैतने ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या जगात प्रवेश केल्याची माहिती आहे, ज्यामध्ये आमिर खान आणि जायरा वसीम मुख्य भूमिकेत होते. या व्यतिरिक्त त्यांनी ‘लाल सिंग चड्ढा’ दिग्दर्शित केला, परंतु हा चित्रपट फ्लॉप ठरला.
जुनैदने ‘महाराज’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जयदीप अहलावत, शर्वरी वाघ हे कलाकारदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसले. Khushi Kapoor And Junaid Khan |
तर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि तिचा पती बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर पहिल्यांदा जोया अख्तरच्या ‘द आर्चीज’मध्ये दिसली होती. हा चित्रपटही फक्त नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.