पुणे – करोनाच्या साथीने उच्चांक गाठल्यानंतर सर्वसामान्य पुणेकरांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) मैदानावर उभारलेले जम्बो कोविड सेंटर अखेर 15 जानेवारीला बंद करण्यात आले. येथे गेल्या सहा महिन्यांत तब्बल 1,911 जणांवर उपचार करण्यात आले.
उपचार घेणारे शेवटचे काही बाधित बरे होऊन गेल्यानंतर ते बंद करण्यात आले. दरम्यान, सहा महिन्यांत या रुग्णालयावर तब्बल 105 कोटींचा खर्च झाला आहे. तर, हे रुग्णालय सर्वसामान्य पुणेकरांसाठी महत्त्वाचे ठरले. दरम्यान, अखेरच्या दिवशी करोनामुक्त होऊन घरी जात असलेल्या नागरिकांना कोविड सेंटरच्यावतीने मास्क आणि सॅनिटायझर या वस्तू भेट देण्यात आल्या.
शहरात जुलैमध्ये करोनाच्या साथीने जोर धरला होता, त्यानंतर रुग्णसंख्या वाढतच असल्याने शहरातील खासगी रुग्णालयात खाटांची संख्या कमी पडत होती. त्यामुळे सीओईपी मैदानावर हे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले. सुरूवातीलाच येथील व्यवस्थापनाच्या तक्रारी वाढल्याने तसेच रुग्ण दगावण्याचे प्रमाण अधिक असल्याने हे हॉस्पिटल चर्चेत आले होते. त्यामुळे येथे नेमलेल्या ठेकेदाराचे काम रद्द करून हे हॉस्पिटल चालवण्याची जबाबदारी महापालिकेकडे देण्यात आली. त्याचे व्यवस्थापन अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याकडे होते.
त्यानंतर गेल्या सहा महिन्यांत या रुग्णालयात जवळपास 1,911 जणांवर उपचार करण्यात आले. तर, हे सेंटर महापालिकेच्या माध्यमातून चालवले जात असल्याने या ठिकाणी मोफत उपचार देण्यात येत होते. त्यामुळे शेकडो पुणेकरांनी या रुग्णालयास प्राधान्य दिले. तर, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून बाधित कमी झाल्यानंतरही शहरात बेड्स उपलब्ध असतानाही नागरिक जम्बोमध्ये उपचारांस प्राधान्य देत होते.
मात्र, आता साथ ओसरल्याने तसेच रुग्णांच्या तुलनेत या सेंटर चालवण्याचा खर्च अधिक असल्याने विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या आढावा बैठकीत जानेवारीत हे सेंटर बंद करण्याचा निर्णय घेला. त्यामुळे दि.1 जानेवारीपासून येथे नवीन रुग्ण घेण्यात येत नव्हते. अखेर 15 जानेवारी रोजी शेवटचा रूग्ण घरी सोडण्यात आल्यानंतर हे सेंटर बंद करण्यात आले असल्याचे अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी सांगितले. दरम्यान, अखेरच्या .दिव