Pune Crime | जम्बो ब्लेड कटरने मानेवर वार करत खूनाचा प्रयत्न; एकाला अटक

पुणे – रमजानच्या महिण्यात नशा करु नको असले सांगितल्याने एका तरुणाच्या मानेवर जम्बो ब्लेड कटरने वार करण्यात आले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णेलयात उपचार सुरु आहेत. कोंढवा खुर्द येथे शुक्रवारी घडली.

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी नदीम अब्दुल सलम शेख (25,रा.कोंढवा) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी बिलाल शेख (28,रा.कोंढवा) हा रस्त्याने पायी जात असताता त्याला त्याच्या ओळखीचा नदीम शेख भेटला.

नदीम यास नशा करण्याची सवय असल्याने बिलाल त्याला रमजानच्या महिण्यात नशा करत नको जाऊ असे म्हणाला. याचा राग मनात येऊन नदीमने त्याच्या खिशातील जम्बो कटर बाहेर काढत बिलालच्या मानेवर सपासप वार केले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपक बर्गे करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.