सिएटल – चार इंजिन आणि दोन मजले असलेले बोईंग 747 विमान 1970 नंतर बरेच लोकप्रिय झाले होते. मात्र आता छोट्या विमानाची गरज वाढली आहे. त्यामुळे हे विमान इतिहास जमा होणार आहे.
या विमानांसाठी लागणाऱ्या स्पेअर पार्टची शेवटची ऑर्डर गेल्या वर्षी देण्यात आली होती. प्रवासासाठी हे विमान उपयोगी ठरत नव्हते. मात्र दरम्यानच्या काळात ई-कॉमर्स वाढल्यामुळे मालवाहतुकीसाठी या विमानाचा वापर वाढला होता. आता या क्षेत्राकडूनही या विमानाचा वापर कमी झाल्यामुळे हे विमान लवकरच इतिहास जमा होणार आहे.