असांजे विरोधातील बलात्काराचा खटला मागे

लंडन : विकिलक्‍सिचा संस्थापक ज्युलिअन असांजे यांच्या विरोधात स्वीडीश न्यायलयात सुरू असणारा बलात्काराचा खटला मागे घेण्यात आला आहे. असांजेच्या हस्तांतरणाबाबत लंडनच्या न्यायलयात खटला सुरू असतानाच ही घडामोड घडली आहे.

स्वीडनच्या सरकारी वकील इव्हा मारीया पर्सन यांनी ही माहिती दिली. या खटल्याला सामोरे जाण्यासाठी स्वीडनच्या ताब्यात दिले जाऊ नये म्हणून जामीनासाठी अर्ज न करता असांजे 50 आठवड्यांच्या कारावासाची शिक्षा भोगत आहे.

दरम्यान, अभिनेत्री आणि पशु हक्क कार्यकर्त्या पामेला अँडरसन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया यांना पत्र पाठवून आपल्या अधिकाराचा वापर करून असांजे यांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे. तुम्ही हे हस्तांतरण रोखले तर जग तुम्हाला समाल करेल, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.