-->

#HBD : 200हून जास्त आंब्याच्या झाडांची मालकीण आहे जुही

मुंबई – आपल्या मोहक हास्याने आणि मार्मिक अभिनयाने एकेकाळी प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री जुही चावला हिचा आज वाढदिवस. 13 नोव्हेंबर 1967 रोजी  लुधियानात जुहीचा जन्म झाला. ‘सल्तनत’ या चित्रपटातून जुहीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. जुहीने आपल्या बॉलिवूड करियरची सुरुवात आपल्या दमदार अभिनयाने आपली एक वेगळी जागा सिनेसृष्टीमध्ये बनवली आहे.

यानिमित्त जाणून घेऊया जुही चावला यांच्या आयुष्याविषयी आणि त्याबद्दलच्या माहिती नसलेल्या काही इंटरेस्टिंग गोष्टी…

‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये जुहीला खरी ओळख मिळाली. पुढे तिने अनेक हिट चित्रपट दिलेत. म्हणूनच बॉलिवूडमधल्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून जूही चावला ओळखली जाते. नव्वदच्या दशकात आलेल्या अनेक चित्रपटांत जूहीने आपल्या अभिनय आणि रुपाने राज्य केले. तीने इश्‍क, डर, हम है राही प्यार के, यस बॉस, मिस्टर अँड मिसेस खिलाडी असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

200हून जास्त आंब्याच्या झाडांची मालकीण आहे जूही..

जूही मागील 8 वर्षापासून शेती करत आहे आणि तिच्याकडे 200 हून जास्त आंब्याची झाडे आहेत. बगीच्यामध्ये चीकू, पपई, डाळींबाचीही झाडे आहेत आणि ऑरगॅनिक फळांव्यतीरीक्तती फार्महाऊसमध्ये भाज्यांचेही उत्पादन करते.

जूहीने मांडवा गावात 10 एकर जमीन खरेदी केली आहे आणि तिथे ती ऑरगॅनिक भाज्या उगवण्याचे काम करते. या भाज्या जूहीचे पती आणि केकिचन रेस्तरॉचे मालक यांच्यापर्यंत पोहोचतात. फार कमी लोकांना माहीत आहे की जूही ऑरगॅनिक प्रोडक्टसला प्रोत्साहन देत आहे आणि त्यासाठी ती शेतीही करते.

 

View this post on Instagram

 

Nature itself is the best physician ?☝️

A post shared by Juhi Chawla (@iamjuhichawla) on

काही काळापूर्वी वुमेन ऑफ इंडिया ऑर्गेनिक फेस्टिवल कार्यक्रमात जूही चावलाची ब्रँड अॅम्बेसेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी जूहीने सांगितले की, एकदा का जर तुम्हाला ऑरगॅनिक पदार्थ खाण्याची आवड निर्माण झाली तर तुम्ही कधीच केमिकल्समध्ये बनलेले पदार्थ खाणार नाहीत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.