लगड उद्योग समूहाने जपले समाजभान; नागरिकांच्या आरोग्यासाठी ओपन जिमची निर्मिती

बारामती (प्रतिनिधी) –  कोरणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढावी या भावनेतून येथील लगड उद्योग समूहाने शहरातील श्रीराम नगर येथे ओपन जिम सुरू केली आहे. यासाठी नगरपालिकेची देखील सहकार्य मिळाले असून या जिमची देखबाल लघु उद्योग समूह करणार असल्याचे लगड उद्योगसमुहाचे अविनाश लगड यांनी सांगितले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे.
श्रीरामनगर येथील चौकात नागरिकांसाठी सुशोभित आसन व्यवस्था दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती . त्याचा योग्य सामाजिक वापर दिसून आला.

त्यानंतर ओपन जिमची कल्पना सुचली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यासाठी ओपन जिम फायदेशीर ठरू शकते हा अंदाज आल्याने शहरातील श्रीराम नगर येथे ओपन जिम ची निर्मिती करण्यात आली.

याकामी नगराध्यक्षा पोर्णिमाताई तावरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव व जेष्ठ नगरसेवक किरण गुजर,गटनेते सचिन सातव व नगरसेविका नालिमा मलगुंडे, यांनी सदर जीम नगरपालिकेच्या ओपनस्पेसमध्ये बसविणेस परवानगी मिळणेकामी सहकार्य केले.

श्रीरामनगर दुध संघ सोसायटीच्या बागेमध्ये ही ओपन जीम बसविणेत आली असुन त्याची देखभाल व दुरुस्तीसाठी लगड उद्योगसमूहाचे वतीने लक्ष दिले जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.