चिपळूण – नवे केंद्रीय मंत्री नारायण राणे आज चिपळूणातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी येथे आले होते. पूरग्रस्तांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला. त्यावेळी त्यांच्याशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरल्याने तो एक वादाचा विषय बनला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच केलेल्या दमदाटीमुळे चांगलाच संताप सोशल नेटवर्किंगवरुन व्यक्त केला जात आहे. तसेच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आणि खास करुन शिवसेनेला चांगलच धारेवर धरलं आहे.
यावरूनच आज मराठी वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी नारायण राणेवर टीका केली आहे . ते म्हणाले,“नारायण राणे याना कुठल्याही प्रकारचा सल्ला देणे काहीच फायद्याचे नाही ते पुढे म्हणाले त्यांची जी मुले आहे त्यानं सारखी मूल कधीच कुणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असं म्हणने प्रत्येक आई-बाप आहे.”
ते पुढे म्हणाले,”नारायण रावांबद्दल बोलायला मला इच्छा सुद्धा होत नाही,” असं भास्कर जाधव म्हणाले.