Fake court | Gujarat – गुजरातमध्ये बनावट पीएमओ अधिकारी, बनावट आयएएस आणि बनावट आयपीएसच्या अटकेनंतर आता फसवणुकीची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
अहमदाबाद पोलिसांनी शहरातील दिवाणी न्यायालयासमोर बनावट कोर्ट चालवणाऱ्याला पकडले आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये हे बनावट न्यायालय बऱ्याच दिवसांपासून सुरू होते.
इतकंच नाही तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे मॉरिस ख्रिश्चन नावाच्या व्यक्तीने वादग्रस्त जमिनींसाठी अनेक ऑर्डर्स दिल्या, अनेक ऑर्डर डीएम ऑफिसपर्यंत पोहोचल्या आणि काही डीएम ऑफिसने पासही केल्या.
हे प्रकरण अहमदाबाद शहर दिवाणी सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांपर्यंत पोहोचल्यावर तपासानंतर रजिस्ट्रारने करंज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. पोलिसांनी चौकशीनंतर मॉरिसला अटक केली.
मॉरिस हे व्यवसायाने वकील आहेत. पोलिसांनी आरोपी मॉरिस सॅम्युअल क्रिस्टन आणि त्याच्याशी संबंधित सर्व लोकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 465,467,471,120 (बी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सॅम्युअल ख्रिश्चन यांनी कायद्याच्या तरतुदींशिवाय स्वत: लवाद म्हणजेच न्यायाधीश म्हणून एकतर्फी काम केल्याचा आरोप आहे.
खोटे न्यायाधिकरण म्हणजेच न्यायालय स्थापन करून त्यांनी न्यायालयाचे वातावरण निर्माण केले होते. आरोपीने कोर्टाप्रमाणे त्याच्या बनावट कोर्टात कर्मचारी आणि वकील तैनात केल्याचेही समोर आले आहे.
स्वत: न्यायाधीशासारखे वागले. एवढेच नाही तर त्याने स्वत: दावा निकाली काढला. त्यानंतर सरकारी जमीन खासगी व्यक्तीला देण्यात आली. तर मूळ न्यायालयात कोट्यवधींची सरकारी जमीन खासगी व्यक्तीला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की ॲडव्होकेट ख्रिश्चन यांची मध्यस्थ-न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली नव्हती, परंतु त्यांनी लवाद म्हणून काम केले आणि कायदेशीर तरतुदींचे पालन न करता एकतर्फी आदेश दिला.