मुंबई – बॉलिवूड पार्श्वगायक जुबिन नौटियाल यांचा गुरुवारी अपघात झाला. जुबिन नौटियाल त्याच्या घराच्या जिन्यांवरून पडला होता, त्यानंतर त्याला खूप दुखापत झाल्याचे वृत्त आहे. वृत्तानुसार, त्याची कोपर तुटली असून बरगड्यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. याशिवाय जुबिनच्या डोक्यावर आणि कपाळावर खोल जखम आहे. या घटनेनंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातानंतर जुबिन नौटियाल यांच्या उजव्या हातावर आता शस्त्रक्रिया होणार आहे. डॉक्टरांनी त्याला उजवा हात न वापरण्याचा सल्ला दिला आहे. या बातमीनंतर सर्वजण त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. त्याच वेळी, चाहते आणि कुटुंब या बातमीने खूप अस्वस्थ आणि निराश झाले आहेत. सोशल मीडियावरही झुबिनचे चाहते त्याच्या उत्तम आरोग्यासाठी सतत पोस्ट करत आहेत.
जुबिन संगीत उद्योगातील सर्वोत्तम कलाकारांपैकी एक आहे. नुकतीच त्याची शेवटची मैफल झाली ज्यासाठी तो दुबईला पोहोचला होता. लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान जुबिनला दुबईतील जनतेचे खूप प्रेम आणि पाठिंबा मिळाला.