नऱ्हे येथील ज्ञान मंदिर जेएसपीएम

केजी टू पीएच.डी. असे ब्रीदवाक्‍य प्रत्यक्षात साकारणाऱ्या शेतकरी शिक्षण मंडळ व जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचा कॅम्पस म्हणजे चांगले शिक्षण देणारे आणि जॉब प्लेसमेंटच्या माध्यमातून हमखास नोकरी मिळवून देणारे ज्ञान मंदिर आहे. याचा लाभ गेल्या नऊ वर्षांत हजारो विद्यार्थ्यांनी घेतला आहे आणि म्हणूनच पुणे शहराबरोबरच देश आणि परदेशातही या परिसराची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अर्थातच याचे सर्व श्रेय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ना. डॉ. तानाजीराव सावंत, सचिव गिरिराज सावंत, विश्‍वस्त ऋषिराज सावंत यांचे नेतृत्वाखाली काम करणाऱ्या प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक यांना द्यावे लागेल.

सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना अल्पदरात शिक्षण घेता यावे या हेतूने डॉ. तानाजीराव सावंत यांनी 2010 मध्ये या शैक्षणिक संकुलाची स्थापना केली. पुणे बेंगलोर हायवे जवळील आंबेगाव मधील स्वामीनारायण मंदिराच्या मागे हिरव्यागार डोंगराच्या कुशीत शिक्षण संस्थाची स्थापना करून निसर्गाच्या सानिध्यात एक गुरुकुल निर्माण केले. आज या ठिकाणी सीबीएसई अभ्यासक्रमाच्या इंग्रजी माध्यम शाळा, ज्युनियर कॉलेज, डिप्लोमा कॉलेज, अभियांत्रिकी महाविद्यालय अशा अनेक शाखेतून सुमारे 10 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

या संकुलाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिथले इन्फ्रास्ट्रक्‍चर होय. विस्तीर्ण अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये उभ्या असलेल्या पाच मजली बारा इमारती असून प्रत्येक इमारतीमध्ये अत्याधुनिक डिजीटल क्‍लासरुम, अत्याधुनिक साधन सामग्री असणाऱ्या प्रयोगशाळा उभारल्या असून दोन हजारांहून अधिक कॉम्प्युटर समाविष्ट आहेत. तसेच अत्याधुनिक मशिनरींचा समावेश असलले वर्कशॉप आहेत. स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा करणारे प्लांट आहेत.

आर्थिक व्यवहारासाठी स्वतंत्र बॅंक, एटीएम सुविधा व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय सुविधा व ऍम्ब्युलन्स सेवा उपलब्ध आहे.

सुरक्षेच्या दृष्टिने संपूर्ण संकुलांमध्ये सुरक्षारक्षक, वाय-फाय सुविधा व सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. पुणे शहराच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी 50हून अधिक बसेसची सुविधा देण्यात आली आहे. हिरवाईने नटलेली क्रीडांगणे निर्माण केली आहेत. उच्चशिक्षित शिक्षक वर्ग व प्रशिक्षित शिक्षकेत्तर सेवक यांचेमुळे संकुलाचा निकाल पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व सीबीएसई बोर्डात नेहमीच अव्वल असतो. दर्जेदार शिक्षणामुळे देशातील नामवंत कंपन्या येथे मुलांना नोकरीची संधी देण्यासाठी येतात, म्हणूनच दर्जेदार शिक्षण आणि हमखास नोकरी मिळवून देणारे डेस्टिनेशन म्हणून या संकुलाची ओळख आहे.
– गिरिराज सावंत ,सचिव

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)