नवी दिल्ली – आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा हा पुरस्कार एनडीटीव्हीचे पत्रकार रविश कुमार यांना घोषित करण्यात आला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील कामासाठी रविश कुमार यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
रॅमन मॅगसेसे पुरस्कार फाउंडेशनने म्हंटले कि, रवीश कुमारांचा प्राईम टाइम हा कार्यक्रम जीवनातील वास्तविक मुद्दे आणि सामन्यांच्या अडचणींवर भाष्य करतो. तसेच जर तुम्ही सामान्य माणसाचा आवाज बनला असला तर तुम्ही पत्रकार आहात, असे नमूद केले आहे. रवीश कुमार यांच्याबरोबर म्यानमारमधील पत्रकार को स्वी वीन, थायलंडच्या अंगखाना नेलापाजीत, फिलिपिन्सच्या रेम्युंडो पुतांजे सायाबयाब आणि दक्षिण कोरियामधील किम जाँग की यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
These are the five recipients of Asia’s premier prize and highest honor, the 2019 Ramon Magsaysay Awardees. #RamonMagsaysayAward pic.twitter.com/HrLG1qVt6L
— Ramon Magsaysay Award (@MagsaysayAward) August 2, 2019
दरम्यान, फिलिपाईन्सचे माजी राष्ट्रपती रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने मागील 60 वर्षांपासून हा पुरस्कार दिला जातो. रॅमन मॅगसेसे यांचा 1957 मध्ये विमान अपघातात मृत्यू झाला होता. सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध इत्यादी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराची सुरुवात न्यूयॉर्कमधील रॉकफेलर भावंडांनी केली होती.